मुंबई : दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत अचानक खालावल्याने त्यांना मुंबईच्या खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या अहवालानुसार त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र उपचार सुरु असताना सायरा बानू यांनी अँजिओग्राफी करण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे.
हिंदुजा रुग्णलयातील डॉक्टरांनी सायरा बानू यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे. याबाबतची माहिती डॉक्टरांनी पीटीआयला दिली आहे. यात त्यांना सांगितले की, ‘काल, त्यांची कार्डिअॅक टेस्ट झाली आणि त्यांना कोरोनरी सिंड्रोम असल्याचे निदान झाले. सध्या सायरा बानू यांनी अँजिओग्राफी करण्यास नकार दिला आहे. एकदा त्यांनी परवानगी दिली की डॉक्टर त्यांची अँजिओग्राफी करणार आहे.’
सायरा बानू या नैराश्यात असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. ‘त्यांची पुरेशी झोप होत नाही. मला घरी जायचं आहे, असं त्या सतत म्हणत आहेत’, असं डॉक्टर म्हणाले. दिलीप कुमार यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या, त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात सावलीप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सायरा बानो यांच्यावर जुलै महिन्यात दु:खाचा डोंगरच कोसळला. ७ जुलै रोजी दिलीप कुमार यांचे निधन झाले. त्यामुळे त्या खूप निराश आहेत.
सायरा बानू यांनी लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. त्या १७ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी १९६१ मध्ये शम्मी कपूरसोबत ‘जंगली’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटासाठी सायराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते. अभिनेत्री सायरा बानू लवकर बऱ्या व्हावे अशा प्रार्थना सिनेप्रेमी करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील पाणी प्रश्न मिटणार, मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- ‘आपलेच नगरसेवक घेऊन जात फोडले म्हणून सांगून स्वतःच्या पक्षप्रमुखाला वेडं बनवायचं म्हणजे…’
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

