नवी दिल्ली : उत्तरप्रदेशमध्ये एका भाजपा नेत्याच्या नावावर पाच लसींचा विक्रम आरोग्य विभागाने नोंद केला आहे. एका भाजपा नेत्याने पाच लसीचे डोस घेतले असून सहावा डोस शेड्यूल केल्याचे त्याच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर दाखविण्यात आले आहे.
उत्तरप्रदेशच्या मेरठमधील सरधाना भागात रहाणारे रामपाल सिंग वय ७३ हे बूथ क्रमांक ७९ चे भाजपा अध्यक्ष तसेच हिंदू युवा वाहिनीचे सदस्यही आहेत. त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यानंतर त्यात पाच डोस पूर्ण झाल्याचे दाखवले तसेच सहावा डोसचे शेड्यूलही करण्यात आले होते. या प्रकरणात काहीतरी गैरसमज झाल्याचे मत आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मात्र प्रत्यक्षात या नेत्याने इतके डोस घेतलेच नाहीत. असे या नेत्याचे म्हणणे असून आरोग्य विभागाविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
रामपाल सिंग यांनी सांगितले की, मी पहिला डोस १६ मार्च ला घेतला तर दूसरा ८ मे रोजी घेतला. मात्र जेव्हा मी लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड केले तेव्हा त्यात ५ डोस पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले तसेच सहावा डोसही शेड्यूल करण्यात आला आहे. या प्रमाणपत्रावर पहिला डोस १६ मार्च आणि दुसरा ८ मे रोजी दाखविला तर तीसरा १५ मे आणि चौथा व पाचवा डोस १५ सप्टेंबर रोजी घेतल्याचे दाखवित आहे.
याप्रकरणी पीटीआयने मुख्य वैद्यकीय अधिकारी अखिलेश मोहन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लसीसाठी कोणाकडून दोनपेक्षा जास्त वेळा नोंदणी झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. काही लोकांनी पोर्टल हॅक करुन हे षडयंत्र रचल्याचे दिसत आहे. जिल्हा लसीकरण अधिकारी प्रवीण गौतम या प्रकरणाची चौकशी करत आहेत असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- ‘ठाकरे सरकारच्या ठोकशाहीचा कळस; सोमय्या बोलायला लागल्यावर एवढी का भिती वाटते?’
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- ‘लगे रहो किरीटजी, इनकी बजाते रहो’; नितेश राणे यांचे खोचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
