🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज म्हणजेच 27 जुलैला 60 वा वाढदिवस आहे. कोरोनाचे संकट ओढावलेले असताना आता अतिवृष्टीने राज्यभर थैमान घातलं आहे. या सर्व संकटांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या समर्थकांना वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन अनेक मान्यवर उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना चित्र पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी साडे आठच्या सुमारास ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो,’ असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Birthday greetings to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray Ji. May he be blessed with a long and healthy life. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2021
दरम्यान कोकण व महाराष्ट्रावर नैसर्गिक संकट आल्याने राज्य शोकाकुल आहे, राज्यात अद्याप करोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्याचे नियम पाळणे गरजेचे आहे. म्हणून वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काळजी करू नका ; मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत’ – राज ठाकरे
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार, घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार तर व्यापारी-विक्रेत्यांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम द्या’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
