Share

राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी शिफारस

Published On: 

मुंबई: महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचे विद्यापीठ राज्यात स्थापन करण्याचा निश्चय केला आहे. पुण्यात १ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या बैठकीत भाषा सल्लागार समितीने हा ठराव केला आहे. भारतातील अनेक भागांमध्ये स्वतंत्र भाषाचे विद्यापीठ आहेत. जसे की, वर्धा येथे हिंदी भाषेचे विद्यापीठ तर, आंध्रात तेलुगू विद्यापीठ आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केले असल्याचे निवेदन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

तसेच यावेळी उदय सामंत असेही म्हणाले की, देशातील उत्कृष्ट मराठी भाषा विद्यापीठ राज्याच्या मराठीला शोभेल असे विद्यापीठ स्थापन करणार आहे. तसेच यासाठीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. शासनाने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीच्या व ठरावाचा आढावा घेऊन महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषेचे धोरण ठरविण्यासाठी विविध बाबींवर कार्य करण्यासाठी राज्य शासन समिती नेमणार आहे.

राज्यात भाषा विद्यापीठाचे संकुल, प्रशासकीय यंत्रणा, भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, प्रशासन व नवतंत्रज्ञानात मराठीचा वापर शैक्षणिक विभाग, भाषा प्रयोगशाळा, विद्यापीठाची केंद्रे, कर्मचारी वर्ग, न्यायालयीन कामकाजासाठी मराठी भाषेचा वापर यासारख्या बाबींवर काम करण्यात येणार आहे

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!