🕒 1 min read
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथील कसोटी सामन्यातील खेळपट्टीवरुन वाद निर्माण झाला होता. अनेक खेळाडूंनी ही खेळपट्टी खराब असल्याची तक्रार केली होती. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्याचा निकाल दोनच दिवसात लागला होता. तर या मालिकेतील चौथा सामना तीन दिवसांमध्ये संपला होता.
यावर बराच वाद झाला होता, त्यामुळे आयसीसीने या खेळपट्टीची चाचणी करण्याचे ठरवले होते. आता आयसीसीने या खेळपट्टीवरचा आपला रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टमध्ये आयसीसीने या खेळपट्टीला क्लीन चीट दिली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी ही सरासरी होती असा शेरा आयसीसीने दिला आहे. त्यामुळे आता या मैदानावर कोणतीही कारवाई होणार नाही.
जर आयसीसीने या खेळपट्टीवर कारवाई केली असती, तर या मैदानाला एक नकारात्मक पॉईंट मिळाला असता. आयसीसी नियमाप्रमाणे जर एखाद्या ठिकाणाला ५ नकारात्मक पॉईंट मिळाले, तर त्याठिकाणी वर्षभर आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन होऊ शकत नाही. त्यातच जर नकारात्मक अंकाची संख्या १० झाली तर स्टेडियमवर दोन वर्षांची बंदी घातली जाते. आयसीसीच्या या शेऱ्यामुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला कोणताच दंड द्यावा लागणार नाही, तसंच पॉईंट्सही कमी होणार नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- ‘भंपक गोस्वामीला पकडले, टीआरपी घोटाळा उघड केला त्या बदल्यात केंद्राने वाझेंना पकडून दाखवले’
- लहान मुलांनी भीक मागणे हा कायद्याने गुन्हा; औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल
- अर्धशतक हुकल्याने जेसन रॉयने ‘असा’ व्यक्त केला राग ; सोशलवर व्हिडीओ व्हयरल
- कोहलीने स्टम्पवर काढली भडास ; इंग्लंडला असा झाला फायदा, नक्की काय घडले पहा
- काम होत नसेल तर आम्हाला आत्मदहन तरी करू द्या, घरकुल लाभार्थ्यांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
