Share

कोहलीने स्टम्पवर काढली भडास ; इंग्लंडला असा झाला फायदा, नक्की काय घडले पहा

Published On: 

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.

अहमदाबाद येथे खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या टी -20 सामन्यात इंग्लंडने भारताला सामना विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले होते. तथापि, भारतासाठी लक्ष्य आणखी लहान असू शकले असते परंतु टीम इंडियाच्या गचाळ फिल्डिंगमुळे इंग्लिश संघाने अधिक धावा लुटल्या. या सामन्यात वाईट क्षेत्ररक्षकांच्या यादीत कर्णधार विराट कोहली याचेही नाव आहे, ज्याने मैदानात उत्सुकता दाखवण्याच्या नादात आपल्यावरचा ताबाच गमावला.

इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय फलंदाजी करत असताना ही घटना घडली. बेअरस्टोने 30 यार्ड सर्कलच्या आत शॉट खेळत आणि एक चोरटी धाव घेतली. परंतु जेव्हा क्षेत्ररक्षक नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने चेंडू फेकला तेव्हा बेअरस्टो क्रीजच्या आत उभा असूनही विराटने बेल्स उडवल्या आणि चेंडू स्टंपला लागून दूर गेला. परिणामी इंग्लंडला एक धाव फुकटात मिळाली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!