Share

अर्धशतक हुकल्याने जेसन रॉयने ‘असा’ व्यक्त केला राग ; सोशलवर व्हिडीओ व्हयरल

Published On: 

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियवर टी-20 मालिकेतील दुसरा टी ट्वेंटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय बाद झाला तेव्हा रागाने मैदानाबाहेर पडताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटलर सलामीला फलंदाजीसाठी आले. यावेळी बटरल पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, त्यानंतर रॉय चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. यावेळी तो अर्धशतक करेल असे वाटत होते.

मात्र, वॉशिंग्टन सुंदरने जेसन रॉयला ४६ धावांवर माघारी धाडले. भुवनेश्वर कुमारने त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. त्यानंतर बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना रॉयने संतप्त होऊन आपले ग्लव्हज आणि हेल्मेट फेकले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेक क्रिकेट चाहते या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

https://twitter.com/tridibr100/status/1371108259524800516?s=20

दरम्यान, टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गडी राखुन विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली आहे. या विजयासह टीम इंडियाने ५ सामन्याच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत पुर्ण केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!