Share

नीति मोहनच्या गोंडस मुलाचे फोटो पाहून सेलेब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवुडमधील बऱ्याच सेलिब्रिटींच्या घरी चिमूकल्यांचे आगमन झाले आहे. काही दिवसांपूर्वीच गायिका श्रेया घोषालने गोड मुलाला जन्म दिला, त्यानंतर आता लोकप्रिय गायिका नीति मोहन आणि अभिनेता निहार पांड्या यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यानंतर नीतीने इन्स्टाग्रामवर मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CQOVjw5h2fJ/?utm_source=ig_web_copy_link

नीतिने शेअर केलेल्या एका फोटोत निहार आणि नीति आपल्या बाळाकडे आनंदाने पाहत असल्याचं दिसत आहे.  नीतिने हे फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन देत लिहिले की, ‘या नाजूक हातांना पकडणं हे आता पर्यंतचे सर्वात सुंदर क्षण आहेत. आर्यवीरने आम्हाला आई-वडील म्हणून निवडलं आहे. याहून चांगले आशिर्वाद काय असणार. त्याने आमच्या आयुष्यात आनंद वाढवला आहे.’

नीतिने हे क्यूट फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील तिच्या फोटो आवडले आहेत. तिच्या या पोस्टवर तिची बहिण मुक्तीने देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं अभिनेत्री मौनी रॉय, पंखुडी अवस्थी आणि अभिनेत्री अपारशक्ति खुराना कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर ‘तुमच्या सारख्या दोन सुंदर व्यक्तींना माझ्याकडून शुभेच्छा’, अशी कमेंट करत अनुष्का शर्माने देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!