🕒 1 min read
नवी दिल्ली : सोशल मीडीयावर प्रसिद्धीची हाव माणसाला काहीही करायला भाग पाडू शकते. अशाच एका व्यक्तिने प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोठी क्रुरतेची परिसीमा गाठली आहे. युट्युबवर व्हिडीओ बनवत प्रसिद्धी मिळवण्यासाठी या व्यक्तिने चक्क त्याच्या पाळीव श्वानाला फुगे बांधुन हवेत उडवण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे.
युट्युबवर व्हिडीओद्वारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी गौरव शर्मा या ३२ वर्षीय युवकाने एक व्हिडीओ बनवला. या व्हिडीओत गौरवने काही फुग्यातमध्ये हेलीयम हा गॅस भरला आणि हे फुगे त्याने त्याच्या स्वत:च्या पाळीव कुत्र्याला बांधले. यानंतर त्याने हे फुगे हवेत सोडले. हेलीयम गॅस हा हवेपेक्षा हलका असल्याने फुगा हवेत उडतो आणि फुग्यामुळे हा कुत्राही हवेत उडू लागला. झालेल्या प्रकारामुळे त्या श्वानाचा जीव धोक्यात आला होता. २१ मे रोजी या व्हिडीओचे चित्रीकरण करण्यात आले होते.
सोशल मीडीयावर जेव्हा हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा अनेक पशुप्रेमीनी संताप व्यक्त केला. यादरम्यान पीपील्स फॉर अॅनिमल्स या संस्थेचे सदस्य गौरव गुप्ता यांनी मालदीव नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी युट्युबर गौरवला पोलिसांनी अटक केली आहे. पी.एस. मालवीय नगर याठिकाणी पशु क्रूरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रसिद्धीपोटी केलेल्या या प्रकारामुळे अनेक वन्यप्रेमीनी संताप व्यक्त करत केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना हृदयविकाराचा झटका; अँजिओप्लास्टीनंतर तब्येतीत सुधारणा
- अभिनेता संजय दत्तला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा; सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
