🕒 1 min read
औरंगाबाद : आता शहरभरातील नागरिकांना महापालिकेचा मालमत्ता कर भरणे सोयीचे होणार आहे. यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर निर्धारक व संकलक विभागाने ऑनलाइन प्रणालीच्या अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. शहरात विविध ७५ ठिकाणी क्युऑक्स मशीन बसविल्या जाणार आहेत. या मशीनद्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पालिकेने स्मार्ट सिटीतील ई-गव्हर्नंन्स अंतर्गत मालमत्ताधारकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. शहरातील २ लाख ७३ हजार मालमत्तांची आणि एक लाखापेक्षा अधिक नळ कनेक्शनधारकांची नोंदणी पालिकेच्या दप्तरी आहे. मागील एक वर्षापासून पालिकेच्या कर निर्धारक व संकलक विभागाने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची वसुली करण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासोबतच मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी विविध सुविधा देखील उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहे.
यासंदर्भात उपायुक्त तथा कर निर्धारक व संकलक अधिकारी अपर्णा थेटे यांनी सांगितले की, पालिकेने ऑनलाइन प्रणालीच्या अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करीत मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने ७५ क्युऑक्स मशीन खरेदी केलेल्या आहेत. या मशीनद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
क्रमांक टाकताच दिसेल कराची रक्कम : मालमत्ता कर भरण्यासाठी शहरातील पालिकेचे प्रभाग कार्यालये, विविध सरकारी कार्यालये, हॉस्पिटल, बँका, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, सार्वजनिक कार्यालये या ठिकाणी ७५ क्युऑक्स मशीन बसविण्यात येणार आहे. या मशीनव्दारे मालमत्ता कर भरता येणार आहे. त्यासाठी मालमत्तांना देण्यात आलेला क्रमांक टाकताच त्यावर कराची रक्कम दिसेल, ती मशीनद्वारे भरता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा; न्यायालयाची सरकारला कायदा करण्याचा सूचना
- गणेश मंडळांनी मतदार जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा; पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- ‘मुंबईचे पाप काय, की त्यांना शिवसेनेसारखा पक्ष मिळाला’, निलेश राणेंनी शेअर केला ‘तो’ व्हिडीओ
- ‘उघड दार उद्धवा आता…’; मनसेचे मंदिरे उघडण्यासाठी पुण्यात जोरदार आंदोलन
- एसटी तिकीट यंत्र खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आज लोकायुक्तांपुढे सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
