Share

‘या’ खेळाडूसाठी आरसीबीने जास्त खर्च केला ; संचालकाचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आयपीएल स्पर्धेच्या मेगा ऑक्शनमध्ये आगामी आवृत्तीपूर्वी त्यांच्या संघात २२ खेळाडूंना सामील केले आहे. फ्रँचायझीने वानिंदू हसरंगा, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, जोश हेझलवूड आणि दिनेश कार्तिक यासारख्या स्टार खेळाडूंना ऑक्शनमधून विकत घेतले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या संघाने विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना रिटेन केले होते.

वानिंदू हसरंगा (vanaindu hasranga) आणि हर्षल पटेल (harshal patel) या वर्षीच्या मेगा ऑक्शनमध्ये RCB साठी सर्वात महाग खेळाडू ठरले. दोघांनाही आरसीबीने १०. ७५ कोटीत खरेदी केले होते. आता आरसीबीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, फ्रँचायझीचे क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माईक हेसन यांनी हसरंगा ही आरसीबीसाठी “सर्वात महत्त्वाची विदेशी खरेदी” असल्याचे म्हटले आहे. ” आम्ही हंसरंगासाठी १० कोटी खर्च केले. मात्र मॉक ऑक्शनच्या तयारीत आम्ही त्याच्यासाठी ८ कोटी ठेवले होते. तो आमच्यासाठी महत्वाचा होता. तो उत्तम फलंदाजी करतो आणि समतोल राखतो. त्या भूमिकेसाठी त्याच्या शिवाय पर्याय नव्हता.”

हेसनने त्याच व्हिडिओमध्ये हे देखील उघड केले की संघाला युझवेंद्र चहलला संघात परत आणायचे होते, परंतुऑक्शनमध्ये त्यांना आवश्यक बजेट वाटप करणे कठीण झाले होते. “जर आम्हाला माहित असेल की आम्ही युझी मिळवू शकतो, तर आम्ही युझी मिळवण्याचा प्रयत्न करू. युझी आमचा आवडता आहे.जेव्हा त्याची बोली आली त्याचे बजेट वाढत होते जर आम्ही त्याच्यासाठी गेलो असतो तर हसरंगा हातून गेला असता आणि आम्ही मोठ्या अडचणीत सापडलो असतो अशी सगळी ती परिस्थिती होती,”अशी माहिती हेसन यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!