Share

आरसीबीला मिळणार लवकरच नवा कर्णधार, या खेळाडूचे नाव झाले निश्चित

Published On: 

नवी दिल्ली : आयपीएलचा १५ वा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरु होणार आहे . या हंगामात दोन नवीन संघ सामील झाले आहेत त्यामुळे आयपीएलला आता मोठी रंगत येणार आहे. या हंगामात सर्वच संघांमध्ये बदल झाले आहेत. विराट कोहलीच्या रॉयर चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये तर मोठा फेरबदल करण्यात आला आहे. त्यात लवकरच आरसीबीला आपला नवा कर्णधार मिळणार आहे. त्यासाठी येत्या १२ मार्चला पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

विराटने आयपीएल २०२१ नंतर संघाचे कर्णधारपद सोडले आहे. आरसीबी आपला या हंगामातील पहिला सामना २७ मार्च रोजी पंजाबविरुद्ध खेळणार आहे. या अगोदर संघाचा कर्णधार निश्चित करणे गरजेचे आहे. याच कारणामुळे साऊथ आफ्रिकन खेळाडू डू प्लेसीसचे नाव कर्णधार म्हणून निवडण्यात आल्याचे म्हटले जात आहे. येत्या १२ मार्चला आरसीबीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून यामध्ये कर्णधार म्हणून प्लेसीसचे नाव जाहीर केले जाणार आहे. आयपीएल २०२१ नंतर कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून हे पद रिकामेच आहे.

डू प्लेसीसचे नाव कर्णधारपदासाठी निश्चित होण्याअगोदर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या गळ्यात आरसीबीच्या कर्णधारपदाची माळ पडणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र तीन सामन्यांमध्ये मॅक्सवेलची उपस्थिती नसेल. याच कारणामुळे संघाने डू प्लेसीसचा कर्णधारपदासाठी विचार केला असावा.

दरम्यान, डू प्लेसीस साऊथ आफिकन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असल्याने त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. क्रिकेटच्या एकदीवसीय, टी२०, आणि कसोटी अशा तीनही प्रकारात कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. चेन्नई सुपरकिंग्स या संघाकडून खेळताना तो फलंदाजीसाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरायचा. विराटनंतर डू प्लेसीसकडे संघाचे नेतृत्व जाणार असल्यामुळे आगामी काळात बेंगलोर संघ यंदाच्या हंगामात काय जादू करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!