नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना रावळपिंडी मैदानावर सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ४७६ धावांवर घोषित केला. तर ऑस्ट्रेलियाने सर्व विकेट्स गमावून ४५९ धावा केल्या. या डावात पाकिस्तानने १७ धावांची बढत घेती आहे. पाकिस्तानने आपला दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे.
या सामनाची आता ड्रॉच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. या सामन्याचा निकाल काहीही लागो परंतु या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी जी पाहायला मिळाली ती एकदम जबरदस्त होती. पाकिस्तानच्या नौमान अलीने या सामन्यात सर्वाधिक जास्त ६ विकेट्स घेतल्या.
https://www.instagram.com/p/Ca1KavDKu7g/?utm_source=ig_web_copy_link
परंतु चर्चा आहे ती पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या त्या यॉर्कर चेंडूची कारण या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा यॉर्कर किंग मिचेल स्टार्क पायचीत बाद झाला. त्याने हा चेंडू रॉकेट प्रमाणे टाकला होता. स्टार्कही हा चेंडू पाहून आफ्रिदीकडे पाहत राहिला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

