Share

राहुल कनाल यांचा दिशा सालियन प्रकरणाशी संबंध? नितेश राणेंचा मोठा दावा

Published On: 

मुंबई: मुंबईत सेनेच्या कार्यकर्त्यावर ईडीने कारवाई केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेना नेते राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. मात्र भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या प्रकरणाचा थेट दिशा सालियन प्रकरणाशी संबंध जोडला आहे.

राहुल कनाल यांचा दिशा सालियन प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत तपास झाला पाहिजे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. ८ जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आणि १३ तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्यावेळचं राहुल कनालचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं पाहिजे. यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल. असे राणे यांनी म्हटले आहे.

तसेच राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग असून त्याचे वडील डेंटिस्ट होते. मग राहुल कनालकडे इतका पैसा कुठून आला? त्याच्याकडे कोणाचा पैसा आहे? राहुल कनाल मुंबईत ‘भाईजान’ हे हर्बल हुक्कापार्लर चालवतो. तसेच तो कॅफे बांद्रा नावाचं रेस्टाँरंट चालवतो. राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीतही त्याचा समावेश आहे. मात्र त्याच्यावर एवढी कृपादृष्टी का? असा सवालही राणे यांनी केला आहे.

दरम्यान राहुल कनाल युवासेनेचे पदाधिकारी असून शिर्डी देवस्थानाच्या विश्वस्तांपैकी ते एक आहेत. आयकर विभागाचे अधिकारी मंगळवारी (८ मार्च) सकाळी सीआरपीएफ जवानांची सुरक्षाव्यवस्था घेऊन त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!