Share

“घर सांभाळून समाजही सांभाळतात..” महिला दिनी केले फडणवीसांनी कौतुक

Published On: 

मुंबई: आज महिला दिन असल्याने सर्वच स्तरातून महिलांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. आजचा दिवस महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस आहे. महिला या एकाच वेळी विविध जबाबदाऱ्या पार पडत असतात. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय महिला सहकाऱ्यांना अशाच शुभेच्छा देत आणि कौतुक केले आहे. “आमच्याकडून घर सांभाळलं जात नाही, पण आमच्या महिला सहकारी मात्र घर सांभाळून हा समाजही सांभाळतात. समाजालाही त्या आपल्या घराप्रमाणेच समजतात” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Women’s World Cup: पाकिस्तानची कर्णधार बिस्माहने आई झाल्यानंतर पहिल्यांदा केले अर्धशतक; मुलीला केले समर्पित

मुंबई: पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफने आई झाल्यानंतर पहिल्यांदाच अर्धशतक केले आहे. तिचे हे अर्धशतक ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात आले आहे. तिने आलिया रियाझ जिने ५३ धावा केल्या तिच्यासोबत मिळून विक्रमी भागीदारी केली आहे. या दोघीनी मिळून पाकिस्तानसाठी ९९ धावांची भागीदारी केली ज्यात बिस्माहने ७८ धावांची नाबाद खेळी केली.

बिस्माहने अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे तिच्या आईकडे आणि बेबी फातेमा कडे पाहत अनोख्या अंदाजात सेलिब्रेट केले. असे सेलिब्रेशन ज्याला ‘बेबी कार्डल’ सेलिब्रेशन म्हणतात ते क्रिकेटच्या मैदानावर बऱ्याचदा पुरुष खेळाडूकडून आले आहे. मात्र पहिल्यांदाच एका महिला खेळाडूने असे सेलिब्रेट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!