Share

वरुण चक्रवर्तीच्या फिरकीमध्ये फसला आरसीबी संघ; वर्ल्ड कपमध्ये ठरू शकतो एक्स-फॅक्टर

Published On: 

🕒 1 min read

अबू धाबी : आगामी टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समाविष्ट केलेला मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने यूएईमध्ये पहिल्याच सामन्यात चमकदार गोलंदाजी करून सगळ्यांना शांत केले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करताना वरुणने अवघ्या 13 धावांत 3 बळी घेतले. त्याने आपल्या उत्तम गोलंदाजीच्या बळावर आरसीबीला बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर आरसीबी पुनरागमन करू शकला नाही आणि 19 षटकांत 92 धावांवर संघ बाद झाला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी वरुण चक्रवर्तीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

वरुणने 2020 मध्ये यूएईमध्ये आयोजित आयपीएलच्या तेराव्या हंगामात चमकदार कामगिरी केली. त्याने पुन्हा एकदा यूएईमध्ये पाऊल टाकताच त्याने आपली क्षमता अशा प्रकारे सिद्ध केली की टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. विराटने सामन्यानंतर म्हणाला की, ‘वरुण जेव्हा भारताकडून खेळेल तेव्हा तो भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त, इतर युवा खेळाडूंना ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची किंवा या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे, आम्हाला त्यांनाही असेच बघायचे आहे. जेणेकरून भारतीय संघाची बेंच ताकद नेहमीच मजबूत राहील. जर वरुण नजीकच्या भविष्यात भारतासाठी खेळणार असेल तर ही चांगली चिन्हे आहेत.

वरुण चक्रवर्तीने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 13 धावा देऊन 3 बळी घेतले आणि या दरम्यान त्याने 15 डॉट बॉल टाकले. चक्रवर्तींनी ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि सचिन बेबी यांना आपले बळी ठरवले. त्याने सलग दोन चेंडूंमध्ये मॅक्सवेल आणि हसरंगाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर आरसीबीला पुनरागमन करता आले नाही. वरुणने सामन्यात शानदार झेल घेतला आणि गोलंदाजीदरम्यान चपळता दाखवताना केली जेमीसनलाही धावबाद केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!