चेन्नई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगळुरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीये, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्याच षटकात कर्णधार कोहली आणि रजत पटिदार हे दोघे बाद झाले. यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने तुफान फटकेबाजी करत पहिले पड्डीकल(२५) आणि नंतर एबी डिव्हीलियर्स सोबत भागीदारी रचत ४९ चेंडुत ९ चौकार आणि ३ षटकारासंह ७८ धावांची खेळी केली. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर डिव्हीलीयर्सने सामन्याची सुत्रे हाती घेतली. एबीने केकेआरच्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवत अवघ्या ३४ चेंडुत ९ चौकार आणि ३ षटकारासंह नाबाद ७६ धावांची वादळी खेळी केली. मॅक्सवेल आणि एबीच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने निर्धारित २० षटकात २०४ धावांचा डोंगर उभा केला.
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या केकेआरने सुरुवातीपासुनच आक्रमक पवित्रा हाती घेतला. मात्र आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात ते चुकीच फटका मारुन ठरावीक अंतराने बाद होत गेले. शेवटच्या काही षटकात आंद्रे रसलने फटकेबाजी करत सामन्यात रंगत आणली मात्र आरसीबीच्या गोलंदाजानी त्याला रोखत केकेआरला निर्धारित २० षटकात १६६ धावावर रोखत ३८ धावांनी विजय मिळवला. केकेआरकडुन आंद्रे रसलने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. तर कायले जेमीनसनने सर्वाधीक ३ गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या
- ३० एप्रिल नंतर लस न घेणाऱ्या नागरिकांना रस्त्यावर फिरू देणार नाही- आस्तिककुमार पांडे
- नव्या ऑक्सिजन टँकमुळे औरंगाबादच्या रुग्णांना दिलासा, खासदार इम्तियाज जलील यांची माहिती
- घाणेरड्या राजकारणापासून दुर होऊन सरकारने कोराेना परिस्थिती निट हाताळावी : आमदार बोर्डीकर
- नांदेडला सोमवारपासून किराणा, भाजीपाला – फळविक्री सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंतच
- आ. संजय गायकवाड यांच्या छायाचित्राला भाजपचे जोडे मारो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

