Share

नव्या ऑक्सिजन टँकमुळे औरंगाबादच्या रुग्णांना दिलासा, खासदार इम्तियाज जलील यांची माहिती

Published On: 

औरंगाबाद : घाटी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये लवकरच २० हजार लिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन टॅंक बसविण्यात येणार असल्याचे ट्विट रविवारी इम्तियाज जलील यांनी केले आहे. त्यामुळे घाटीमध्ये आता ऑक्सिजन साठवण्याची क्षमता ३० हजार लिटर झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे नव्या ऑक्सिजन टँक आता औरंगाबादच्या रुग्णांना दिलासा दायक असणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी झालेला नाही, रुग्णांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत आहे. ऑक्सिजन पुरवठा आणि ऑक्सिजनच्या मागणी संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी वारंवार पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सुविधा अद्ययावत करण्याची मागणी केली होती. हे टॅंक मिळाल्या नंतर त्यांनी जिल्हाधिकारी आणि अधिष्ठाता यांचे आभार देखील मानले.

औरंगाबाद येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त 20 के लीटर लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्याची घोषणा केल्याबद्दल आनंद झाला. यासह एकूण ऑक्सिजन टाकीची क्षमता 30 के लीटर असेल आणि 200 ऑक्सिजन बेड वाढविण्यात मदत करेल, असे ट्विट मध्ये म्हंटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!