औरंंगाबाद : पूर्ववैमनस्यातून दोन गटात फ्रि-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना २६ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास सिडको एन-४ परिसरातील इंदिरानगर मार्केट येथे घडली.
या हाणामारीत भारत कोळी, राम कोळी, बंटी कोळी यांच्यासह एक महिला आणि रोहन सोमनाथ माळवे, सोमनाथ माळवे आणि एक महिला असे सहा ते सात जण जखमी झाले आहेत.
या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.
कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून मारहाण
तुम्ही पाळलेला कुत्रा आमच्या अंगावर का भुंकला असे म्हणत चार ते पाच जणांनी कैलास रामजी खरात (वय ३९, रा.सातारा गाव, जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे) यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली.
ही घटना २६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. कैलास खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून सैय्यद मन्सूर सैय्यद मुनीर, सैय्यद सादात सैय्यद मंन्सूर, सैय्यद सोहेले सैय्यद मंन्सूर यांच्यासह दोन महिला, सर्व रा.सातारा गाव यांच्याविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

