नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांसह मोदी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. या बदलाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन केले असून या मंत्रालयाचा कारभार आता गृहमंत्री अमित शाह सांभाळणार आहेत.
सहकाराच्या जोडीने राजकारण विकसित झाल्यानंतर सहकार चळवळ राजकारणाचा अड्डा होण्यास प्रारंभ झाला. त्यातून मग सहकार चळवळीची हळूहळू वाताहत होण्यास सुरुवात झाली. सहकारी संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्याचा एक पॅटर्न विकसित होऊ लागला. हे दोष दूर करण्यासाठी आणि देशातील सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी तसेच त्याची पाळेमुळे अधिक खोलवर रुजवण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
दरम्यान केंद्रीय स्तरावर या खात्याची निर्मिती करण्यात आल्याच्या निर्णयाचे रयत क्रांती संघटनेने स्वागत केले आहे. भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात सहकार खाते हे नवीन मंत्रालय सुरू केले आहे, हा निर्णय सहकार चळवळीला नवसंजीवनी देणार आहे .आमचे नेते आ. सदाभाऊ खोत व रयत क्रांती संघटनेच्यावतीने या ऐतिहासिक निर्णयाचे आम्ही हार्दिक स्वागत करतो असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी म्हटले आहे.
शिंदे म्हणाले, सहकार चळवळ ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात वाढली पण काही प्रस्थापित राजकीय मंडळींनी सहकाराचा आपल्या स्वार्थासाठी व राजकारणासाठी उपयोग केला व त्या संस्था मेटाकुटीला आणल्या आहेत. सहकार चळवळ संपवण्याच्या मार्गात असताना केंद्र सरकारने सहकार खाते काढून देशात सहकार चळवळ वाढवण्याचा निर्णय घेताय ही फार महत्वाची घटना आहे ,आणि यात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हा पदभार दिलेला असल्याने सहकार चळवळ वाढेल ही अपेक्षा आहे.
शिंदे म्हणाले, या खात्याचे नवीन मंत्री अमित शहा यांना आम्ही विनंती करतो सहकार चळवळ संपूर्ण देशात, गाव पातळीवर सक्रिय करावी व महाराष्ट्र राज्यातील ज्या राज्यकर्त्यांनी लोकांच्या हितासाठी व लोकांच्या शेअर्सवर उभ्या ठाकलेल्या जिल्हा सहकारी बँक, सहकारी कारखाने, सूतगिरण्या, या खाऊन टाकल्या त्या सर्व राज्यकर्त्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी व या संस्था पुन्हा एकदा लोकहितार्थ लोकांच्या ताब्यात द्याव्यात.
महत्त्वाच्या बातम्या
- भाई जगताप बालंबाल बचावले… मुंबईतील आंदोलनाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
- ‘आईचं दुख: फक्त आईलाच समजतं’ ; पडळकरांनी घेतली लोणकर कुटुंबियांची भेट
- आ.मेटेंची मंत्री परबांसोबत बैठक; एमपीएससी उत्तीर्ण ६१ मुलींच्या निवडीचा प्रश्न मार्गी
- टीम इंडियाच्या सुरक्षिततेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
- ‘म्हातारे तर तुझे आई-बाप…’; कविता कौशिकचे ट्रोलर्सला चोख उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

