Share

भाई जगताप बालंबाल बचावले… मुंबईतील आंदोलनाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले देखील या आंदोलनात सहभागी होत आहेत. मुंबई काँग्रेसच्या वतीने देखील इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा विरोध करण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात आला होता. मात्र, बैलगाडीवर चढणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची संख्या जास्त झाल्याने बैलगाडी तुटली. सुदैवाने या अपघातात कोणालाही ईजा झालेली नाही.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या आंदोलनात सहभागी झाले होते. भाई जगपात या बैलगाडीवर उभे राहुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. काँग्रेसचे कार्यकर्ते ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ ही घोषणा देत असतांना अचानक बैलगाडी तुटल्याने त्यावरील सर्व नेते खाली कोसळले.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात भाई जगताप आणि काँग्रेस कार्यकर्ते बालंबाल बचावले आहेत. कोणालाही ईजा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असलेल्या आंदोलनाचे मात्र, चांगलेच हसू झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!