🕒 1 min read
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होते.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून याचे पडसाद राज्यभर उमटलेले पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेतेमंडळी स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियाची विचारपूस करत आहेत. आज स्वप्नीलच्या आईवडिलांची त्यांच्या मूळ गावी केडगाव, तालुका दौंड येथे जाऊन भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या बहिनीसह संपूर्ण कुटुंबिय़ाचे सांत्वन केले.
यानंतर त्यांनी भावनिक फेसबुक पोस्ट करून त्यांचे मत व्यक्त केले आहे. ‘आपला मित्र स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबाला आज मी भेट दिली. आई-वडिलांचं सांत्वन केलं. खरंतर त्यांच्याशी काय बोलावं हे कळत नव्हतं, आईचं दुख: फक्त आईलाच समजतं, आपण समजू शकत नाही. पण स्वप्नीलला न्याय मिळण्यासाठी मी तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा आहे, याची ग्वाही त्यांना दिली. तसेच स्वप्नीलचा भाऊ म्हणून पुजाच्या लग्नाची जबाबदारी घेतली. मला पुन्हा एकदा सर्व MPSC विद्यार्थी मित्रांना विनंती करायची आहे की, आपण कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये. आपल्या आई- वडिलांचा चेहरा आठवा. ही लढाई आपण एकत्र लढू.’ असा भावनिक आधार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना जी काही मदत लागेल ती करणार- सुप्रिया सुळे
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर पटोलेंचा आक्षेप, याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी
- ‘मागण्या मान्य होत नसतील तर राज्यात पुन्हा आंदोलन सुरू करणार’, संभाजीराजेंचा इशारा
- सामना गमावला तरीही चर्चा भारताच्या ‘सुपरवुमन’ हरलीनची
- संजय राठोड लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार ? शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान


