नांदेड – एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैराण झालेला असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील हे पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राष्ट्रवादीचे नेते मात्र पक्षाचे कार्यकम धुमधडाक्यात करत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अश्याप्रकारे असंवेदनशील वागण्यामुळे अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे.
जयंत पाटील मंगळवारी बीड दौऱ्यावर होते. यावेळी परळीमध्ये पाटलांचं फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आलं. स्वागताचा कार्यक्रम एवढा मोठा आणि भव्यदिव्य झाला की यावेळी बोलताना माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी भावना जयंत पाटलांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैराण असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील व मंत्री संजय बनसोडे स्वतःची पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत आहेत यांना राज्यातल्या शेतकऱ्याचं घेणेदेणे उरलेलं नाही.यांची संवेदनशीलता हरपली आहे अशी टीका रयत क्रांती संघटनेने केली आहे. राज्यात गेल्या वीस दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जनता परेशान असताना मंत्री मस्त अशी अवस्था आज राज्याची झालेली आहे. शेतकऱ्याला एक दमडीची मदतीची घोषणा न करता आपल्याच मोठेपणा करण्यात मशगुल असलेल्या मंत्र्यांना राज्यातील जनता येणाऱ्या काळामध्ये जागा दाखवेल अशी घणाघाती टीका रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाला पडला चांगलाच महागात
- शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

