🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: डॉ. सुजय विखे यांचा भाजपच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क झालेला नाही. माझी व त्यांची भेटही झालेली नाही. विखे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या केवळ दबावतंत्र असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ सुजय विखे यांनी कोणत्याही परस्थितीमध्ये निवडणूक लढणारचचा निर्धार व्यक्त केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र कॉंग्रेसला जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय विखे हे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सुजय हे काही विद्यमान आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लावला आहे.
दुसरीकडे, नगर लोकसभेच्या जागेवरून कॉंग्रेस – राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवीन खेळी खेळण्यात आली आहे. यामध्ये लोकसभा लढवण्यासाठी सुजय विखे हे राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
