मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावासाहेब दानवेंनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- नाथाभाऊंचे पक्ष सोडणं धक्कादायक आणि दुःखद – मुनगंटीवार
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला!-जयंत पाटील
- फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक ; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
- एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार : जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

