Share

रवींद्र जडेजा ‘या’ फॉरमॅटमधून घेणार निवृत्ती!

Published On: 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा  (Indian Cricket Team) महान अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)  दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा (SA vs IND) भाग नाही. नुकताच तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला पण दुखापतीमुळे तो दुसरा कसोटी सामना खेळू शकला नाही. रवींद्र जडेजाच्या जवळच्या मित्राने आणि त्याच्या सहकाऱ्याने दिलेल्या महिनुसार जडेजा दुखापतीमुळे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो.

रवींद्र जडेजाची दुखापत इतकी गंभीर आहे की, त्याला बरे होण्यासाठी 4 ते 6 महिने लागू शकतात. जडेजाच्या एका सहकाऱ्याने असेही सांगितले की, रवींद्र जडेजा दीर्घकाळ एकदिवसीय आणि टी-२० खेळण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. रवींद्र जडेजाची दुखापत इतकी गंभीर आहे की तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतही खेळताना दिसणार नाही. रवींद्र जडेजा कदाचित IPL 2022 मध्ये खेळताना दिसेल.

अलीकडेच रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जने १६ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. तसेच कसोटी क्रिकेटपासून दूर राहिल्यास टीम इंडियाला मोठा झटका बसू शकतो. कारण रवींद्र जडेजा हा टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.

रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 57 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 232 बळी घेतले आहेत, तर फलंदाजीत 33.76 च्या सरासरीने 2195 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाने २०१२ नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!