नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाने मोहाली कसोटी सामन्यातील रवींद्र जडेजाच्या प्रदर्शनाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, हा सामना इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल.
आपल्या यू ट्यूब चॅनेलवर त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने जडजाचे भरपूर कौतुक केले आहे. “तो म्हणाला की भारताने श्रीलंकेला अवघ्या तीन दिवसात हरवले. रवींद्र जडेजाचे प्रदर्शन खूप जबरदस्त राहिले. सर जडेजाच्या प्रदर्शनात मागील २-३ वर्षांपासून खूप बदल झाला आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जबरदस्त खेळत आहे. आता त्याच्याकडे खूप समज आणि अनुभव आला आहे.
कनेरिया पुढे म्हणाला की, जडेजाने दाखवून दिले आहे की एक डाव कसा चांगला बनवला जाऊ शकतो. तुम्ही त्याला खेळातून बाहेर ठेऊ शकत नाही. तो आपली ही खेळी कायम लक्षात ठेवेल.”
रवींद्र जडेजाने मोहाली सामन्यात नाबाद १७५ धावांची खेळी केली तर ९ विकेट्स ही घेतल्या. त्याच्या या अष्टपैलू खेळीच्या जोरावर भारताने हा सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या :


