मुंबई : शेतीतील पिकांची काळजी घेताना विविध खतांचा, कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. पिकांसाठी कीटकनाशके घरीच मिळाली तर शेतकऱ्यांना आर्थिक मोठा दिलासा मिळतो. असेच एका शेतकऱ्याने जैविक कीटकनाशक खुद्द घरी बनविले आहे, या शेतकऱ्याचे नाव गनीभाई सय्यद आहे. यांनी स्वतः घरी जैविक कीटकनाशक बनविले. ते कसे पाहूया सविस्तर..
या कीटकनाशकाचा फायदा काळा मावा, पिवळा मावा, हिरवा मावा, थिप्स तुडतुडे, पांढरी माशी, रस शोषन करणाऱ्या सर्व कीडी, मिरची वरील बोकड्या व्हायरस, टोमॅटो वरील लीफ व्हायरस, हरभऱ्यावरील व तुरी वरील घाटे अळी, भेंडी वांग्यावरील शेंडे अळी, मक्यावरील लष्कर अळी, कपाशीवरील गुलाबी बोंड अळी, फळ पोखरनारी अळी, इ. सर्व कीडींचा विनाश होतो पिकावरील समस्या दुर होतील आणि शेतकऱ्यांचा आर्थिक खर्चही कमी होईल.
प्रक्रिया :
एकरीसाठी प्रमाण – ५ लीटर देशी गाईचे ताजे ताक घ्या त्यामधे एक कीलो हिंगणास्त्र कमीत कमी ५ तास भिजत ठेवा नंतर हे द्रावण दोनशे लीटर पाण्यात टाका आणि गाळुन घेऊन फवारणी करा. कांद्याचे हवामान बदलल किंवा धुई पडली, रीमझीम पाऊस झाला की कांद्याचे शेंडे जळणे सुरु होतात अशावेळी हिंगणास्त्राची फवारणी चांगल काम करते. कांद्याच्या पातीमधे आकडी मावा असतो त्यावर देखील हिंगणास्त्र उपयोगी पडतो.
महत्वाच्या बातम्या –


