मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेली होती. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. साधारण 40 मिनिटे दोघांची चर्चा झाली.
“मी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. मला मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीबद्दल सांगितले. मला आशा आहे की मला न्याय मिळेल, जेणेकरुन तरुण मुलींसह सर्व नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा संपादन होईल. माझे भाग्य आहे की राज्यपालांनी माझे म्हणणे स्वत:च्या मुलीसारखे ऐकून घेतले” अशी प्रतिक्रिया कंगनाने भेटीनंतर दिली.
मात्र कंगना रनौत आणि राज्यपालांच्या या भेटीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘कंगनावर झालेला अन्याय ऐकण्यासाठी राज्यपाल महोदयांनी तिला तात्काळ भेट दिली. पण वर्षांनुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाखवतील काय..?’ असा सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला आहे.
कंगनावर झालेला अन्याय ऐकण्यासाठी राज्यपाल महोदयांनी तिला तात्काळ भेट दिली. पण वर्षांनुवर्षे अन्याय सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटण्याची तत्परता मा.राज्यपाल @BSKoshyari दाखवतील काय..? @ANI
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) September 13, 2020
दरम्यान, मुंबईतील नाट्यानंतर अभिनेत्री कंगना रनौत मनालीला रवाना झाली आहे. खूप जड अंतकरणाने मी मुंबई सोडत आहे, असं ट्वीट कंगनाने केलं आहे. गेल्या 9 सप्टेंबरला कंगना मुंबईत दाखल झाली होती. त्यानंतर 5 दिवसांनंतर कंगना पुन्हा हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे तिच्या घरी जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या अहंकारी स्वभावामुळे कोरोनाचा उद्रेक-राहुल गांधी
- अकोले तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना, लोकप्रतिनिधी कुठे आहेत?- वैभव पिचड
- मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढता येत नाही- श्रीहरी अणे
- संसदेने भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभं रहायला हवं-पंतप्रधान नरेंद्र मोदी
- ‘कोणाचा बॅंड वाजतो तर कोणाचा ब्रॅंड गाजतो’ – मनसेची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

