नवी दिल्ली: भारतातील दररोजची कोरोना रुग्णवाढ ही जगात सर्वात जास्त आहे. याच नियोजन सरकारला नीट करता आलेल नाही.आता पुढच्या आठवड्यात भारतात कोरोना रुग्णसंख्या ५० लाखांच्या वर असेल, अनियोजित लॉकडाउनमुळे देशभरात कोरोना पसरला अशा परिस्थीतीत देशातील लोकांना त्यांच्या भरवशावर सोडून मोदीजी मोरांबरोबर खेळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी स्वभावामुळेच भारतात कोरोनाचा उद्रेक होत असल्याची जळजळीत टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या या आठवड्यात 50 लाख तर अक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 10 लाखांच्या घरात पोहोचली आहे. लॉकडाउनचे योग्य नियोजन न करता आल्यामुळे एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे, अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली.
कोरोना संक्रमण के आँकड़े इस हफ़्ते 50 लाख और ऐक्टिव केस 10 लाख पार हो जाएँगे।
अनियोजित लॉकडाउन एक व्यक्ति के अहंकार की देन है जिससे कोरोना देशभर में फैल गया।
मोदी सरकार ने कहा आत्मनिर्भर बनिए यानि अपनी जान ख़ुद ही बचा लीजिए क्योंकि PM मोर के साथ व्यस्त हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 14, 2020
दरम्यान, पूर्ण देशात सध्या कोरोनाचं संकट आहे. रोजच्या वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे चिंतेचं वातावरण असताना यात आता संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. आजपासूनच अधिवेशनाला सुरुवात होणार असून 1 ऑक्टोबरपर्यंत याचं कामकाज चालू असणार आहे. या अधिवेशनात कोरोनाच्या मुद्द्यावरून विरोधक मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकत्र घेण्यात आलं आहे. तर सामाजिक अंतर ठेवतच संसदेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या राजकीय पक्षांना मेन चेंबर आणि विजिटर्स गॅलरीमध्ये जागा नियुक्त करण्यात आल्या आहेत. आता यातल कोणती जागा कोणत्या खासदारासाठी घ्यायची याचा निर्णय त्या-त्या राजकीय पक्षांवर आहे. अधिवेशनाच्या कार्यकाळात कोणतेही खासदार एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी प्लास्टिकच्या शीटचाही वापर केला असल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर खासदारांना ‘अटेंडन्स रजिस्टर’ पद्वारे हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- अकोले तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना, लोकप्रतिनिधी कुठे आहेत?- वैभव पिचड
- संसदेने भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभं रहायला हवं-पंतप्रधान नरेंद्र मोदी
- मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढता येत नाही- श्रीहरी अणे
- नाचता येईना अंगण वाकडे : भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

