Share

Ben Stokes : बेन स्टोक्सच्या निवृत्तीनंतर रवी शास्त्रींनी खेळाडूंच्या तणावाबाबत काढला नवा फॉर्म्युला, म्हणाले…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : क्रिकेटमध्ये सध्या सर्वच देशाचं वेळापत्रक व्यस्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-२० द्विपक्षीय मालिकांत कपात करण्याची मागणी केली आहे. त्याऐवजी फ्रेंचायझी क्रिकेटला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुढील फ्युचर टूर प्रोग्राम (एफटीपी) मसुद्यानुसार टी-२० क्रिकेटमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. त्याचबरोबर इंडियन प्रीमियर लीगसाठी अडीच महिन्यांची विशेष विंडो असेल ( स्पर्धा आयोजित करण्यासाठी स्वतंत्र वेळ.)

सामन्यांची संख्या वाढल्याने अनेक फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा ताणतणाव वाढत आहे. इंग्लंडचा अव्वल अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने सोमवारी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यावेळी स्टोक्स म्हणाला की, तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे त्याच्यासाठी शक्य नाही. या महिन्याच्या सुरुवातीला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने त्यांचे खेळाडू नवीन देशांतर्गत टी-२० स्पर्धेसाठी उपलब्ध असल्याचे सुनिश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

रवी शास्त्री यांनी टेलीग्राफच्या स्पोर्ट्स पॉडकास्टवर सांगितले की, “मी द्विपक्षीय मालिकांच्या संख्येबाबत, विशेषत: टी-२० क्रिकेटमध्ये थोडासा सावध आहे. भारत, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान या देशात अनेक फ्रँचायझी क्रिकेट खेळले जात आहे. या क्रिकेटचा आणखी प्रचार केला जाऊ शकतो. तुम्ही कमी द्विपक्षीय मालिका खेळण्याचा प्रयत्न करा. नंतर विश्वचषक एकत्र खेळू शकता. त्यामुळे आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व वाढेल. त्यांना पाहण्यासाठी लोक उत्सुक असतील.” असे रवी शास्त्रींनी म्हटले आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेननेही क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकावर टीका केली होती. शास्त्री यांनी कसोटी क्रिकेटमध्ये रोमांच वाढविण्यासाठी द्विस्तरीय कसोटी रचना सुचवली आहे. शास्त्री म्हणाले की, “मला वाटते की कसोटी क्रिकेटमध्ये दोन स्तरांची गरज आहे. अन्यथा कसोटी क्रिकेट १० वर्षात संपण्याची भीती आहे.” शास्त्री पुढे म्हणाले की, “तुम्हाला शीर्ष स्तरावर सहा संघ आणि दुसर्‍या स्तरावर सहा संघ हवे आहेत. मग तुम्ही पात्र व्हाल. या अव्वल सहा संघांना कमी टी-२० क्रिकेट म्हणून एकमेकांविरुद्ध खेळण्याची अधिक संधी मिळेल. तसेच खेळाडूंना फक्त फ्रँचायझी क्रिकेटला वेळ देता येईल. त्याचप्रमाणे खेळाचे सर्व स्वरूप सुरक्षित व अबाधित राहू शकतात.” असेही शास्त्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!