Share

Hardik Pandya : “हार्दिक पंड्याला २ वर्षांसाठी संघाबाहेर ठेवणे हा…”, शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य

Published On: 

मुंबई : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. शोएबने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हार्दिकबाबत मत व्यक्त केलं आहे. त्याने म्हटले आहे की, पंड्याला दोन वर्षांसाठी संघाबाहेर ठेवणे हा चांगला निर्णय होता. आधी तो त्याच्या आयुष्यात खूपच कॅज्युअल होता पण आता तो अधिक परिपक्व दिसत आहे. बर्‍याच दिवसांनी शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी त्याने ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याबद्दल मत व्यक्त केले आहे.

हार्दिकबाबत बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, ‘मी खूप आनंदी आहे की हार्दिक सारखा गोलंदाज म्हणून पुनरागमन करत आहे. खास करून मला त्याची गोलंदाजी पहायची होती. तो त्याच्या कामगिरीने संघाछा समतोल ठेवण्याचे काम करतो. हार्दिक आता पूर्वीपेक्षा खूपच फिट दिसत आहे यात शंका नाही. आधी तो खूप कॅज्युअल दिसत होता पण आता तो अधिक मॅच्युअर दिसत आहे.’

शोएब म्हणाला कि, ‘हार्दिकने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. तो आता स्वतः च्या खेळाचा आनंद घेत आहे असे दिसते. शोएबने हार्दिकला एक सल्लाही दिला आहे. हार्दिकने मैदानाबाहेर जास्त आनंद घेऊ नये. कारण तो संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो एक उत्तम क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट वेगवान गोलंदाजही आहे. मैदानात उतरून तो ज्या पद्धतीने काम करतो, तिथे अनेक गोलंदाज आल्यानंतरही अपयशी ठरतात. पण हार्दिक मात्र त्यांचे काम करून जातो. हार्दिक जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू देखील बनू शकतो यात शंका नाही. असेही अख्तरने म्हटले आहे. व्हिडिओमध्ये शोएबने श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानच्या चांगल्या कामगिरीचाही उल्लेख केला आहे.

२२ जुलैपासून विंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेची सुरुवात एकदिवसीय सामन्याने करणार आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना २२ जुलै रोजी होणार आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. दुसरीकडे भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे संघ ३० जुलैपासून बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!