Jayant Patil । मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जयंतकुमार बाठिंया आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये ओबीसांनी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये २७ टक्के पर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस केली होती. कोर्टानं हा अहवाल मान्य केल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळणार आहे. मात्र यानंतर यावरून राजकीय वर्तुळात आता श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षजयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले कि, राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास मान्यता देण्याच्या माननीय सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. मविआ सरकारने सदर आरक्षण टिकवण्यासाठी मेहनत घेतली होती. ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व कायम राहावे यासाठी आम्ही प्रयत्न केले व त्यास यश आल्याचे समाधान आहे, असं ते म्हणाले.
बंढीया आयोगाची स्थापना – १० मार्च २०२२
९९% डाटा जमा – २६ मे २०२२
डाटाचं विश्लेषण आणि रिपोर्ट सादर – १० जुलै २०२२
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शपथ – ३० जुन २०२२बंठीया आयोगाच्या रिपोर्ट आणि आजच्या निकालाचं श्रेय महाविकास आघाडीचंच. #ThankyouMVA#धन्यवादमविआ
— Gaykar Dnyandeo M. (@dmgaykar) July 20, 2022
तसेच पुढे दुसऱ्या ट्विट मध्ये जयंत पाटील म्हणतात कि, बंढीया आयोगाची स्थापना – १० मार्च २०२२ ला झाली. ९९% डाटा जमा – २६ मे २०२२ ला झालं. डाटाचं विश्लेषण आणि रिपोर्ट सादर – १० जुलै २०२२ ला सादर झाला. तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री शपथ – ३० जुन २०२२ रोजी घेतली होती. तर बंठीया आयोगाच्या रिपोर्ट आणि आजच्या निकालाचं श्रेय महाविकास आघाडीचंच आहे, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Hardik Pandya : “हार्दिक पंड्याला २ वर्षांसाठी संघाबाहेर ठेवणे हा…”, शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
- Supreme Court : “एकनाथ शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही तर मग…” ; अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया
- Devendra Fadanvis on OBC Reservation | दिलेला शब्द पाळला! OBC आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
- Kishori Pednekar : “संजय राऊत आणि अनिल परब शिवसेनेचे वाघ आहेत, ते या सगळ्याला… “; किशोरी पेडणेकरांच राणांना प्रत्युत्तर
- Balasaheb Thorat : मीच ‘मुख्यमंत्री’ आहे, हे एकनाथ शिंदेना सिद्ध कराव लागेल – बाळसाहेब थोरात


