Share

Kishori Pednekar : “संजय राऊत आणि अनिल परब शिवसेनेचे वाघ आहेत, ते या सगळ्याला… “; किशोरी पेडणेकरांच राणांना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

kishori pedanekar। मुंबई : काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली. यानंतर यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संजय पांडे यांच्या नंतर आता पुढचा नंबर शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा आहे. या दोघांना अटक होणार, असं त्या म्हणाल्या. तर नवनीत राणा यांच्या या वक्तव्यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिल आहे.

नवनीत राणा या छान भविष्यवाणी करतात, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी नवनीत राणा यांना लगावला आहे. न्यायिक बाजू आणि जे काही आहे यावर मी बोलणार नाही, मात्र शिवसेनेचे जे दोन्ही वाघ आहेत, ते या सगळ्याला निभावून पुढे जातील. मात्र आतापर्यंत दिल्ली गल्लीत बघत नव्हती. मात्र आता दिल्ली गल्लीही बघायला लागली, अशी टीकाही यांनी केली आहे.

दरम्यान, मागच्या सहा-सात महिन्यातले दिवस पाहिल्यास अनिल परब यांची अनेकदा ईडी कडून चौकशी झाली आहे. अनिल परब यांनी दिलेली उत्तरही ईडी साठी समाधानकारक नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा चौकशीला बोलावलं जात आहे. तसेच संजय राऊत यांचीही अनेकदा ईडीकडून चौकशी झाली आहे. त्यांना ईडीचे अनेकदा नोटीसा येत आहेत, असंही नवनीत राणा म्हणाल्या. मात्र राणा यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा शिवसेना विरुद्ध राणा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!