मुंबई : मालिकेच्या सेटवर असेल किंवा नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी कलाकार अनेकवेळा लोकलचा प्रवास करतात. अभिनेता सागर कारंडे याने सुद्धा नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहोचण्यासाठी मुंबई लोकलच्या गर्दीतून प्रवास करत नाट्यगृह गाठले. त्याच्या तोंडाला मास्क असल्याने त्याला कोणी ओळखलं नाही.
त्याने इन्स्टावर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिलं आहे. सागरनं फोटो शेअर करत म्हटलं आहे की, नाटकाच्या प्रयोगाला वेळेत पोहचण्यासाठी लोकल ने प्रवास
चला हवा येऊ द्या या शोमधून घराघरात पोहोचलेला सागर कारंडेने नेहमीच प्रेक्षकांना भरभरून हसवलं. विनोदाचे अचूक टायमिंग साधलेल्या सागरकडे केवळ प्रेक्षकांना हसवण्याचीच किल्ली नाही, तर टचकन डोळ्यात पाणी आणण्याचे सामर्थ्यही आहे. हे त्याच्या पोस्टमन या व्यक्तिरेखेने दाखवून दिले आहे. ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकात सागर सध्या काम करत आहे. या नाटकाच्या प्रयोगाला पोहोचण्यासाठी सागरनं लोकलमधून प्रवास केला.
चाहत्यांकडून देखील त्याचे यासाठी कौतुक होत आहे. अनेकांनी कमेंट करत त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :

