मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नोटाबंदीच्या काळात साडे १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्याचे प्रकरण भाजपा नेते फडणवीस यांनी दाबल्याचा दावा केला होता, त्यावरच फडणवीस यांनी मलिकांच्या आरोपाला एका वाक्यात उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांनी ट्विटमध्ये एक सुविचार शेअर केलाय. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा हा सुविचार आहे. ‘आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबतची कुस्ती आपल्याला घाण करते आणि तेच डुकराला आवडतं’, असा आशय त्या सुविचारात होता. आता यावरच शिवसेना नेते खासदार संजय राऊत ट्वीट करत टोला लगावला आहे.
‘चिखलात लोळण्याचा कार्यक्रम वक्तशीर झाला. बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी दोघांनाही उशीर झाला’ अशी कवी रामदास फुटाणे यांची चारोळी ट्वीट करत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यासंबंधी सूचक ट्वीट केले आहे.
चिखल
——–
चिखलात लोळण्याचा
कार्यक्रम वक्तशीर झाला
बर्नार्ड शॉ वाचण्यासाठी
दोघांनाही उशीर झालारामदास फुटाणे
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 11, 2021
दरम्यान फडणवीस यांनी या ट्विटमध्ये कुणाचेही नाव घेतले नव्हते.पण त्यांच्या या ट्विटचा निशाणा स्पष्टपणे नवाब मलिक यांच्याकडेच इशारा करत असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे, अमृता फडणवीस यांनीही ट्विटद्वारे पुन्हा एकदा मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ‘बिघडलेल्या नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेवर पत्रकार परिषद घेतली. पण प्रत्येक वेळी ते फक्त खोटे बोलले. त्यांचे ध्येय एकच आहे, त्यांना त्यांचा जावई आणि काळा पैसा वाचवायचा आहे!,’ असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- नवाब मलिक स्वत:ची कबर स्वत:च खोदत आहेत; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- जेवढे कर्मचारी दाबाल तेवढे उसळून उठतील- प्रविण दरेकर
- राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकदा विचार करा; संजय राऊतांचं कर्मचाऱ्यांना आवाहन
- कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’


