Share

‘राऊतांनी मेंदू निकामी झाल्यासारखे वक्तव्ये करु नये’; भाजपाचा टोला

Published On: 

मुंबई : ‘राज्यपालांना सही करण्याचा प्रॉब्लमच आहे. तसेच राज्यपाल यांचा उल्लेख ‘पांढरा हत्ती” असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावर आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. अगदीच मेंदू निकामी झाल्यासारखे वक्तव्ये राऊतांनी करु नये, असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.

१२ आमदारांच्या नियुक्तीसंदभात राज्यपालांकडे दिलेल्या प्रस्तावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्याप स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे या आमदारांची नियुक्ती रखडली आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, “राज्यपालांना सही करण्याचा प्रॉब्लम आहे, मात्र नेमका काय प्रॉब्लम आहे, ते माहित नाही. खरतर महाराष्ट्र मंत्रीमंडळांनी केलेल्या शिफारशी त्यांना स्वीकारणं बंधनकारक असतं, ते त्यांचं कर्तव्य आहे. हे भाजपा नेत्यांना कुणीतरी समजावून सांगितले पाहिजे. ते फक्त घटनेचा हवाला देतात, राज्यपालांनी आमच्या १२ आमदारांची नियुक्ती का रखडवली आहे, याचे कारण भाजपाच्या लोकांनी आम्हाला सांगावं. अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी राज्यपाल आपल्या पदाचे अवमुल्यन करताना दिसून येतात. राज्यपाल पांढरे हत्ती झाले आहेत.” असे संजय राऊत भाजपावर टीका करताना म्हणाले होते.

यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टीका केली आहे. भातखळकर म्हणाले,
“राज्यपालांचा उल्लेख शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पांढरा हत्ती असा केलाय. शिवसेनेकडून सभ्यपणाची अपेक्षा कोण करेल? पण अगदीच मेंदू निकामी झाल्यासारखे लोकांना वाटेल, अशी वक्तव्ये त्यांनी करू नये.” असा टोला भातखळकर यांनी राऊतांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!