Share

‘५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होऊ शकतात, तर मग ११९ वाले राज्यसभेत का जाणार नाहीत?’

Published On: 

मुंबई : काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी चार ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. आज बुधवारी सकाळी अकरा वाजता संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.

अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना उपाध्याय यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. ‘राजकारणात काहीही होऊ शकते. ५६ आमदार असलेले मुख्यमंत्री होतात. ५४ वाले उपमुख्यमंत्री होतात. ४४ वाले महसूलमंत्री बनतात. आमचे १०६ आणि १३ अपक्ष आमदार म्हणजे ११९ आमदार होतात. मग ११९ वालेही राज्यसभेत जाऊ शकतात. उपाध्याय राज्यसभेत जाणारच. अजून अपक्ष मिळाले तर १२७ किंवा १२८ चा आकडाही आम्ही गाठू शकतो, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

दरम्यान, संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. संजय यांच्या वडिलांचं नाव रामभक्त आहे. त्यांच्या वडिलांनी अयोध्येच्या राममंदिराचं भूमिपूजन केलं आहे. त्यामुळे ते राज्यसभेवर निवडून जाणं आमच्यासाठी भूषावह आहे. संजय उपाध्याय हे राज्यसभेवर निवडून जाणे हे येत्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहे. त्यांच्यामुळे नक्कीच उत्तर प्रदेशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपला फायदा होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!