🕒 1 min read
मुंबई:- शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडीच्या नोटीसीवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत. भारतीय जनता पार्टीचे माकड कालपासून उड्या मारत आहेत. भाजपचे तीन नेते तिथून कागदपत्र काढतात आणि ते माहिती लीक करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केली आहे.
एक काळ होता की ईडी, सीबीआय, सीआडी या विभागांना एक प्रतिष्ठा होती. मात्र आता केंद्रातलं सरकार ईडीचा वापर हे आमच्यावर सूड उगवण्यासाठी करत आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भाजपच्या हस्तकांनी या ना त्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या हस्तकांनी मला 22 आमदारांची एकच यादी दाखवली. या आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- … अखेर राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे खरे कारण आले समोर
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- देशातील पहिल्या ‘चालकरहीत’ मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- काँग्रेसच्या आमदारांनी घेतली अमित शाह यांची भेट; दोन आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
