🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट उपराष्ट्रपतींना पत्र (Sanjay Raut direct letter to Vice President)लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी ईडीवर खळबळजनक आरोप केले आहेत. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले बनली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावरच भाजप नेते अतुल भातखळकर ( BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर…” असा उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांनी (shivsena MP Sanjay Raut) ईडीवर आरोप केला आहे. असले बालिश आरोप करण्यापेक्षा राऊत यांनी न्यायालयात जावे. आणि बहुमत आमच्या बाजूने आहे म्हणून सतत टिमकी वाजवणारे प्रवक्ते सरकार पडेल म्हणून कशाला घाबरतात?”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटले?
अंमलबजावणी संचालनालयासारख्या कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींचा वापर करून शिवसेना खासदार/नेत्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. या प्रक्रियेत अंमलबजावणी संचालनालयाचे कर्मचारी आमच्या आमदारांना धमकावण्यास/छळण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.आम्हाला आमची स्वतःची विचारधारा असण्याचा अधिकार आहे आणि जो केंद्रात सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाशी संयोगाने असू शकत नाही. ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सीद्वारे तपास करण्याच्या नावाखाली राजकीय विरोधकांना त्रास देण्याच्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच सुमारे एक महिन्यापूर्वी, मला काही लोकांकडून संपर्क करण्यात आला आणि त्यांना महाराष्ट्रात राज्य सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास सांगण्यात आले. राज्याला मध्यावधी निवडणुकीसाठी भाग पाडता यावे म्हणून मी अशा प्रयत्नात मोलाची भूमिका बजावावी अशी त्यांची इच्छा होती. असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
- “…ऑफर नाकारली म्हणून”, संजय राऊतांचे थेट उपराष्ट्रपतींना पत्र; ईडीवर केले खळबळजनक आरोप
- “राहुल गांधी देशाबद्दल बोलतात आणि नरेंद्र मोदी…”; काँग्रेसची टीका
- “त्यांनी मला व्हॅनमधून…”; विराट कोहलीला आठवला जुना किस्सा
- “…तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झोडल्याशिवाय राहणार नाही”, अनिल बोंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
