🕒 1 min read
मुंबई: विराट कोहलीने २००८ पासून सगळे हंगाम आरसीबीसोबत खेळले आहेत. तो १४ हंगाम एकाच संघाकडून खेळणारा पहिला क्रिकेटर सुद्धा ठरला आहे. विराटने मागच्या वर्षी ९ वर्षानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडले.त्यानंतर त्याला भारताच्या कर्णधारपदावरूनही बरखास्त करण्यात आले. इतक सगळ झाल्यानंतरही विराटने आरसीबीसोबत खेळाडू म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने यासंबंधी आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला गेला आहे.
आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये विराटने आरसीबीसोबतच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले आहे.यात त्याने एक जुना किस्साही शेअर केला आहे. “आयपीएलचा पहिला सीजन संपल्यानंतर मी अंडर-१९चा मुलगा असल्यामुळे मला ओम्नी व्हॅनमध्ये एअरपोर्टवर पाठवण्यात आले होते. बाकी सगळ्यांना जाण्यासाठी चांगली कार दिली गेली होती, आणि मी एकटाच उरलो होतो आणि त्यांनी कदाचित त्याला काहीही द्या आणि त्याला विमानतळावर घेऊन जा असे म्हटले असेल.”
आरसीबीमध्ये सुरुवातीला काळात राहुल द्रविड आणि झहीर खानसारखे मोठे खेळाडू फ्रँचायझीचा भाग होते. याबाबतही विराटने सांगितले कि मोठ्या खेळाडूंना संघात सोबत बघून तो भारावून गेला होता. ” मी तिथे गेलो. जिथे सगळे जण बसलेले होते. बँगलोरसाठी कोण कोणती भूमिका करेल अशी चर्चा सुरु होती. तिथे झॅक (जहीर खान) आणि पिके (केविन पीटरसन) यांना टीम लॉन्चच्या वेळी भेटलो. तो सगळं अनुभव अविश्वसनीय होता.”
महत्वाच्या बातम्या
- “…तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झोडल्याशिवाय राहणार नाही”, अनिल बोंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल
- “भारतीय नेत्यांनी…”; कर्नाटकातील हिजाब वादावर मलाला युसफझाईची प्रतिक्रिया
- आनंद महिंद्रा यांना सापडली ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची ‘भिंत’, फोटो शेअर करत म्हणाले…
- अपक्ष उमेदवाराची ‘मोदी रसोई’ ठरतेय चर्चेचा विषय
- “…त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही”, नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
