Share

एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव

Published On: 

मुंबई: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने क्वीन्सटाउनच्या जॉन डेव्हिस ओव्हल येथे सोफी डिव्हाईनच्या न्यूझीलँड विरुद्ध झालेल्या एकमेव टी २० सामना खेळला ज्यात त्याला केवळ १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत आधी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. न्यूझीलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५५ धावा केल्या. ज्यात न्यूझीलँडची सलामीवीर बेट्स हिने सर्वाधिक ३६ धावा केल्या तर भारताकडून गोलंदाजीत पूजा वस्त्रकार आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. न्यूझीलँडच्या १५५ धावांचे पाठलाग करताना भारतीय फलंदाज २० षटकात केवळ ८ बाद १३७ धावा करता आल्या आणि त्यांचा पराभव झाला. दौऱ्यात हा एकमेव टी २० सामना होता.

एकट्या टी २० च्या समाप्तीनंतर भारतीय संघाचे लक्ष एकदिवसीय मालिकेकडे असेल. भारताची पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका १२ फेब्रुवारी पासून होईल. न्यूझीलँड विरुद्ध मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय महिला संघ करेल. ज्यामुळे त्यांना ४ मार्चपासून सुरू होणार्‍या 2022 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी मदत मिळेल. .मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघ 2017 च्या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचला होता. मात्र त्यांना इंग्लंडकडून हृदयद्रावक पराभव पत्करावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!