Share

“…तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झोडल्याशिवाय राहणार नाही”, अनिल बोंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला आहे. पंजाब, युपीमधील कोरोना वाढण्यावर महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर कॉंग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress state president Nana Patole) यांनी भाजपने माफी मागण्याची मागणी केली आहे. आता या पार्श्वभूमीवरील भाजप नेते अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत (Anil Bonde audio clip goes viral) आहे.

“आज नाना पटोले यांनी म्हटले कि, भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार. भाजपने माफी मागावी. खर तर या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची माफी मागावी, कारण कोरोना काळात हे कुणाच्याच कामाला आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,नाना पटोले फिरकले नाही. लोकांना त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले. आणि म्हणून जर का, हे गमत्या करत असेल आणि कॉंग्रेसचे काळे कुत्रेदेखील भाजपच्या कार्यालयावर आले, तर भाजप त्यांना झोडपल्याशिवाय राहणार नाही. हे नाना पटोले यांनी लक्षात ठेवावे”, असा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे.

तसेच छत्रपती शिवरायांच्या राज्यात वाईन विकणाऱ्या कॉंग्रेसने राज्याची माफी मागावी. कॉंग्रेसने वाईन किराणा दुकानात आणली. आणि ते आम्हाला शहाणपण शिकवतात कि ,ते सहन करणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसनेच माफी मागावी, अशी मागणीही अनिल बोंडे(BJP leader Anil Bonde) यांनी केली आहे. सध्या हि ऑडिओ क्लिप जाम व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!