Share

‘भाजयुमो’ ची महत्वाची तिनही पदे नेत्यांच्या पुत्रांना; कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगरमध्ये ज्येष्ठ नेते चंद्रशेखर कदम यांचे पूत्र देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांना भाजयुमो च्या अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले. तसेच माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना सरचिटणीस, तर माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचे चिरंजीव विवेक बेरड यांना खजिनदार हे पद देण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चाची नगर दक्षिण कार्यकारिणी काल जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली. त्यामध्ये तीनही महत्त्वाची पदे तीन महत्त्वाच्या नेत्यांच्या पुत्रांना देण्यात आले आहे. परंतु इतर कार्यकर्ते मात्र सतरंज्या उचलूनच मेले, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

भाजपने युवकांच्या संघटनेचे पदे जाहीर करताना राजकीय घराण्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र उपेक्षित राहिले असल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांतून होत आहे. तसेच भाजयुमो ची दक्षिण नगर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर राहुरी तालुक्याचे पारडे जड झाले आहे.

महत्त्वाचे तीनही पदे एकाच मतदारसंघात देण्यात आली आहेत. देवळाली प्रवराचे सत्यजीत कदम, बुऱ्हाणनगरचे अक्षय कर्डिले व दरेवाडीचे विवेक बेरड हे एकाच म्हणजे राहुरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे एकाच मतदारसंघात तीनही पदे देण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री प्रा.राम शिंदे व शिवाजी कर्डिले, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड आदी नेत्यांना कार्यकारिणी जाहीर करताना विश्वासात घेतले असल्याचे जिल्हाध्यक्ष मुंढे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!