Share

बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊत सोमय्यांवर भडकले

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णब गोस्वामीसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव असता ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध करून अर्णबच्या जामीनावर तातडीने सुनावणी करण्यात आली.

अर्णबला करण्यात आलेली अटक ही राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असून गेल्या काही महिन्यात सुशांत सिंह राजपूत, पालघर येथील साधू प्रकरण, कंगना रानौत प्रकरण आदी प्रकरणावरून सातत्याने महाराष्ट्र सरकार व महाविकास आघाडीतील पक्षांवर टीकास्त्र सोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईमध्ये काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले आहेत.

यावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्या बाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र” असा आक्रमक इशारा देखील संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!