Share

शेतकरी विरोधी धोरणे रद्द करावीत; बलिप्रतिपदा दिनी हजारो शेतकरी पंतप्रधानांना पत्र पाठविणार!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशभरातील शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने आपल्या शेतकरी विरोधी धोरणामध्ये बदल करावा या मागणीसाठी बलिप्रतिपदा दिनी राज्यातील हजारो शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत.

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचे काम थांबवा असे शेतकरी पत्रात सांगणार आहेत. यासाठी किसान सभेने राज्यव्यापी पत्र मोहिम सुरु केली आहे. शेतकरी नेते अजित नवले यांनी याबाबत भूमिका व्यक्त करत केंद्र सरकार शेती मालावर निर्यात बंदी लादून आणि बेसुमार शेतीमाल आयात करुन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप केला आहे.

अजित नवले पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने तूर आणि उडिदाच्या आयात कोट्यास मुदतवाढ दिली. मोझॅम्बिककडून दरवर्षी २ लाख टन तूर आयात कराराची मुदत या वर्षी संपत होती, त्या कराराला मुदतवाढ देत तूर आयात सुरू ठेवली. नाफेडलाही कांदा आयात करायला सांगितला.

टी.आर.क्यू. कोट्याअंतर्गत १० लाख टन बटाटा आयातीची प्रक्रिया सुरु केली. आयातकर १० टक्क्यांपर्यंत कमी केला. भूतानकडून ३० हजार टन बटाटा आयात होईल याची व्यवस्था केली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळणार नाही याची तजवीजच या सरकारकडून करण्यात आली आहे, असे अजित नवले यांनी सांगितले.

सरकारने आपल्या या शेतकरीविरोधी धोरणामध्ये बदल करावा या मागणीसाठी बलिप्रतिपदा दिनी राज्यातील हजारो शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविणार आहेत. किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या बैठकीत या बाबतचे सविस्तर नियोजन करण्यात आले. राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पत्र लिहून घेण्याची मोहीम सुरु केली आहे. १६ नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर मिरवणुका काढून ही हजारो पत्रे पोस्ट पेटीत टाकली जाणार आहेत, अशी माहिती किसान सभेने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!