अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सद्यस्थितीत महाराष्ट्रातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ह्या दुरवस्थेकडे आदर्श गाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. यासंदर्भात पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी पवार यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, वाळू व खडी वाहतूक करणार्या वाहनांमुळे ग्रामिण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नद्यांचे वाळू लिलाव व खडी क्रेशर असलेल्या भागात रस्ते सातत्याने नादुरुस्त होत असतात. लोकांना वाळू, खडी, कच, क्रश सॅन्ड व डबर आदींची बांधकामासाठी आवश्यकता असते.
परंतु ग्रामीण भागातील रस्त्याची क्षमता या जड वाहतुकीसाठी नसते. त्यामुळे हे रस्ते वारंवार खराब होतात. जड वाहतुकीमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आहे. या विषयाच्या अनुषंगाने पवार यांनी ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे.
नद्यांचे वाळू लिलाव व खडी क्रेशर असलेल्या भागात रस्ते सातत्याने नादुरुस्त होत असतात. या क्षेत्रात येणार्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रॉयल्टीच्या मिळणार्या उत्पन्नातील काही निधी मिळाल्यास नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास होणार नाही. शासन निर्णयानुसार अडीच ब्रासपेक्षा जास्त जड वाहतूक ग्रामीण भागातील रस्त्यांवरून करण्यास परवानगी नसते.
परंतु अडीच ब्रास वाहतूक वाहन मालकांना परवडत नसल्यामुळे ते जास्त अवजड वाहतूक करतात व त्यामुळे रस्ते खराब होतात. त्यांचा भुर्दंड सामान्य नागरिकांवर पडतो. तसेच राष्ट्रीय महामार्गांना रस्ते तयार करताना, ज्या प्रकारची तरतूद असते, त्या प्रमाणात या भागातील रस्त्यांना तरतूद केल्यास रस्ते मजबूत होतील व जड वाहतुकीमुळे खराब होणार नाहीत. असा निर्णय झाल्यास रात्री-अपरात्री होणारी वाहतूक थांबेल व रस्ता अपघाताचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही पवार यांनी पत्रात व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटील यांनी फक्त सरकार पडण्याची स्वप्न पहावीत; थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला!
- लढा सुरूच : बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार; तेजस्वी यादवांनी व्यक्त केला विश्वास
- “राहुल गांधी विद्यार्थ्यांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत, पण त्यांची योग्यता नाही.”- बराक ओबामा
- खोटे सोने खरे भासवून १३४ जणांनी काही कोट्यावधी रुपयांचे कर्ज उचलले; आणखी एका बँकेला गंडा!
- ‘भाजयुमो’ ची महत्वाची तिनही पदे नेत्यांच्या पुत्रांना; कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

