Share

रेशन दुकानदारांनी लाभार्थ्यांच्या याद्या प्रदर्शित कराव्यात ; पालकमंत्री अमित देशमुख यांची सूचना

Published On: 

लातूर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रास्तभाव दुकानातून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत असते. ज्या लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप झाले आहे त्याच्या याद्या रास्त भाव दुकानाच्या बाहेर आणि ग्रामपंचायतीच्या बाहेर लावण्याच्या सूचना संबंधित यंत्रणा द्याव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिककार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

लाभार्थ्यांच्या याद्या प्रदर्शित केल्याने धान्य कुणाला वाटप झाले हे सर्वांना समजू शकेल. प्रत्यक्षात किती धान्य आले आणि त्याचे वाटप कोणाला झाले याचा तपशील असल्याने तक्रारी राहणार नाहीत, काळाबाजार होणार नाही आणि कुठलीही माहिती दडपण्याचे प्रकार होणार नाहीत, असेही पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.

रास्तभाव दुकानातून अनेक वेळा धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शासनामार्फत देण्यात येणारे धान्य प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचावे आणि शिधावाटप पत्रिका धारकांची फसवणूक होऊ नये म्हणून हे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!