Share

‘भाजपचे आंदोलन आणि माध्यमांच्या सातत्यामुळे राठोडांचा राजीनामा घेतला’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीवरून उडी मारत जीवन संपवले होते. या तरुणीचे संबंध हे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी जोडल्याचे आरोप होत असून कथित ऑडिओ रेकॉर्डिंग्ज देखील आता समोर आले आहेत. यामुळे संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारीचं भान राखत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली होती.

येत्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारची डोके दुखी वाढणार हे स्पष्ट होतं. यामुळेच, अधिवेशनाआधी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील दबाव होता. संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी बोलवून राजीनामा देण्यासाठी सांगितले होते. यानुसार संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.

दरम्यान, यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ‘केवळ त्यांच्या राजीनाम्यानं भागणार नाही तर राठोडांना अटक करा. संजय राठोडांचा राजीनामा याआधीच घ्यायला हवा होता. संजय राठोड यांचा राजीनामा हा लोकांचा दबाव, भाजपचे आंदोलन आणि माध्यमांच्या सातत्यामुळे घेतला गेल्याचं चंद्रकांत पाटीलांनी सांगितले. राठोडांचा केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही, तर त्यांना अटक करा आणि पूजा चव्हाणला न्याय द्या’, असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!