Share

उल्टी गिनती सुरू! संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘मी निर्दोष आहे’ म्हणणाऱ्या शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राठोड यांच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहभाग आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी होत असलेला दबाव यामुळे शिवसेनेनं संजय राठोड यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटीसाठी वेळ मागितली होती. पण उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी वेळ नाकारली आहे. त्यामुळे संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे.

मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहता वनमंत्री यांना अधिक काळपदावर ठेवणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे वनमंत्री राठोड यांनी स्वतः राजीनामा द्यावा असा दबाव सध्या त्यांचा वर असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे सरकारवरील वाढता दबाव लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आहे. ही बैठक होण्या आधी राठोड हे उद्धव ठाकरे यांना भेटणार होते. त्यावेळी दोघांमध्ये राजीनाम्यावर चर्चा होईल असे अंदाज होता.

पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही भेट नाकारली आहे. त्यामुळे संजय राठोड यांना आता राजीनामा द्यावा लागणार हे स्पष्ट झाले आहे. पुढील काही तासांतच संजय राठोड त्यांचा वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करून संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार असे संकेत दिलेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!